By  
on  

अभिजात नाटक 'हिमालयाची सावली' पुन्हा रंगभूमीवर

मराठी रंगभूमीला दर्जेदार नाटकांची एक परंपरा आहे. मराठी रंगभूमीवरील महत्वाच्या नाटकांमधील एक नाटक म्हणजे 'हिमालयाची सावली'. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ४७ वर्षांनंतर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येणार आहे. 'श्री बाई समर्थ', 'ती फुलराणी' या नाटकांनंतर राजेश देशपांडे 'हिमालयाची सावली' या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहे.

१९७२ साली या नाटकाच्या मूळ आवृत्तीत डॉ. श्रीराम लागू यांनी प्रमुख भूमिका केली होती. शांता जोग, अशोक सराफ यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका होत्या. डॉ. श्रीराम लागू यांनी हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबियांना काय भोगाव लागतं, याभोवती या नाटकाचं कथानक गुंफण्यात आलं आहे. प्रतिभावंत लेखक वसंत कानेटकर यांनी हे नाटक लिहिलं आहे.

राजेश देशपांडे हे नाटक नव्याने रंगभूमीवर आणत असून अभिनेते शरद पोंक्षे हे प्रमुख भूमिकेत काम करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोविंद चव्हाण, प्रकाश देसाई हे या नाटकाचे निर्माते आहेत. लवकरच हे नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive