बॉलिवूडच्या देसी गर्लने असा साजरा केला निक जोनसचा वाढदिवस

By  
on  

बॉलिवूडची देसी गर्ल विदेशी झाल्यापासून खुपच धमाल आणि मस्तीत वावरताना पाहायला मिळतेय. नेहमीच प्रियंका चोप्रा आणि तिचा भावी पती निक जोनस यांच्या चर्चा रंगताना आपल्याला दिसतात. त्यांच्यासाठी हा आठवडा खुप खास ठरला. या आठवड्यात निक जोनसचा वाढदिवस होता. हा त्याचा  वाढदिवस अवस्मरणीय ठरला. १६ सप्टेंबर हा निकचा वाढदिवस. कॅलिफोर्नियात निकने त्याचा हा वाढदिवस प्रियंका आणि आपल्या काही खास मित्रांसोबत जबरदस्त साजरा केला.

https://www.instagram.com/p/BnxTSJ7HzqR/?utm_source=ig_embed

निकच्या वाढदिवसाचे हे खास क्षण प्रियंकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. बर्थडे हॅंग असं कॅप्शन देत प्रियंकाने निकचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. प्रियंकाने आठवड्याभरापासूनच निकच्या वाढदिवसाची तयारी केली होती. कारण ती निकच्या वाढदिवसाचा आठवडा संपूर्णपणे विविध फोटो आणि हटके कॅप्शन पोस्ट करत चाहत्यांना प्रत्येक प्रसंगाची माहिती देत होती. प्रियंकाने पोस्ट केलेले हे फोटो इतके व्हायरल झाले आहेत की त्यांना तीन लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाले आहेत.

सलमान खान स्टारर भारत सोडल्यानंतर प्रियंका सध्या द स्काय इज इन पिंक या बॉलिवूड सिनेमामध्ये काम करतेय.

Recommended

Loading...
Share