By  
on  

मराठी अभिनेत्रींच्या बिकनीतील या हॉट अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा !

मराठी सिनेसृष्टी म्हटलं की फक्त लाजत-मुरडत साडी किंवा ड्रेसमध्ये दिसणा-या अभिनेत्री हे चित्र कधीच पालटलं. मराठी अभिनेत्रींनासुध्दा आता ग्लॅमरस लूकमध्ये पाहायला मिळते. त्या नेहमीच आपल्या स्टाईलची खास काळजी घेताना दिसतात. एखादा इव्हेंट असो किंवा पुरस्कार सोहळे आपली छाप पाडण्यात त्या कधीच मागे राहत नाही.

कधी काळी बिकनी ही फक्त हॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्रींची मक्तेदारी होती. पण हल्ली आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमधून मराठी अभिनेत्रींनी ती मोडीत काढली. तुमच्यासाठी मराठी अभिनेत्रींचा हा खास हॉट अंदाज पाहा फक्त पिपींगमून मराठीवर.

सई ताम्हणकर 

 

बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्रींमध्ये सईचा अव्वल क्रमांक आहे. ती नेहमीच आपल्या हॉट अंदाजात प्रेक्षकांवर भुरळ पाडत असते.

नो एन्ट्री सिनेमातील सईचा हा बिनधास्त आणि बेधडक बिकनी लूक पाहून सर्वच अवाक् झाले होते.

सई ताम्हणकर या चतुरस्त्र अभिनेत्रीने फक्त मराठीतच नाही तर हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. देहव्यापारासारख्या ज्वलंत विषयावर भाष्य करणारा सईचा लव्ह सोनिया हा आंतरराष्ट्रीय सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमातील अंजली या भूमिकेसाठी सईचं प्रेक्षकांसोबतच बॉलिवूडकरांनीसुध्दा प्रचंड कौतुक केलं.

नेहा पेंडसे 

मराठी मालिकांमधून सोज्वळ भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी नेहा पेंडसेने आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोशूटने आपल्या या इमेजला तडा दिला आणि ग्लॅमरस अभिनेत्री असल्याचं सिध्द केलं.

मराठमोळ्या नेहाने मराठीसोबतच अनेक भाषांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. हिंदी मालिकांमधूनसुध्दा तिच्या विविध भूमिका पाहायला मिळाल. नेहाने सध्या कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या हिंदीतील सुपरहिट रिएलिटी शो बिग बॉसच्या 12 व्या सीझनमध्ये एन्ट्री घेतली आहे. ती या शोची विजेती ठरणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

स्मिता गोंदकर

पप्पी दे पारुला म्हणत सर्वांना आपल्या मनमोहक अदांनी भुरळ पाडणारी स्टंट गर्ल स्मिता गोंदकर नेहमीच प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री म्हणून बिरुद मिरवते.

बोल्ड आणि ब्युटिफुल स्मिताने पहिल्या-वहिल्या मराठी बिग बॉसच्या अंतिम फेरीत टॉप 3 स्पर्धकांमध्ये पोहचण्याचा मान मिळवला. स्मिताने बिग बॉस मराठीचं टायटल जरी जिंकलं नसलं तरी आपल्या वागण्याने प्रेक्षकांची मनं मात्र जरुर जिंकली.

श्रृती मराठे

राधा ही बावरी मालिकेतून घराघरांत लोकपिरिय झालेली श्रृती मराठे हीने अनेक मल्याळम आणि तेलगू भाषांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली  आहे.

सध्या सुरु असलेली श्रृतीची जागो मोहन प्यारे मालिकेतील  परीची भूमिका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पसंतीची ठरतेय.

पारंपारिक असो किंवा पाश्चिमात्य प्रत्येक अंदाजात ती खुलून दिसते. श्रृतीची प्रमुख भूमिका असलेला शुभलग्न सावधान हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive