भारताच्या इतिहासात ज्यांनी सुवर्णकाळ निर्माण केला ते शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज.. त्यांचं कार्यकर्तृत्व बघताना इतिहास रोमांचित झाला आणि त्यांच्या अकस्मात जाण्याने हाच इतिहास गहिवरला, काळाचा कठोर स्वरही त्याक्षणी कातर झाला. म्हणूनच आजवर छत्रपती शिवाजी महाराजांवर निर्माण झालेल्या कोणत्याही नाटकात, मालिकेत, चित्रपटात शिवाजी महाराजांच्या निर्वाणाचा प्रसंग दाखवण्यात आलेला नाही.
शिवाजी महाराजांच्या निर्वाणासंबंधी आजही अनेक मतभेद, वाद-विवाद प्रचलित आहेत. त्यासंबधी अनेक गैरसमज आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला ज्या प्रसंगाने शोकाकुल केले तो प्रसंग झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. म्हणूनच कोणत्याही नाटक, चित्रपट, आणि मालिकेतून दाखवण्यात न आलेला शिवाजी महाराजांच्या निधनाचा प्रसंग प्रथमच ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून लहान-थोर सर्वांनाच पाहायला मिळणार आहे.
शिवाजी महाराजांच्या निर्वाणाबाबत त्याकाळी प्रचंड गुप्तता पाळली गेली होती, ज्येष्ठ पुत्र असूनही युवराज संभाजी राजांना अंत्यविधीच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. या सगळ्या घटनेनंतर संभाजी राजांच्या आयुष्याला काय वळण मिळतं? रायगडावरच्या राजकारण कोणाच्या हातात जातं? अनाजी दत्तो, सोयराबाई आणि कारभारी मिळून कोणते नवे मनसुबे रचतात? औरंगजेबाच्या वाढत्या आक्रमणांना संभाजी राजे कसं थोपवतात? इतिहासाच्या हृदयात दडलेल्या या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर येत्या गुरुवारी २२ नोव्हेंबर पासून झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा एकही भाग चुकवू नका.
https://twitter.com/zeemarathi/status/1064393770328707073