By  
on  

 पाहा Video : अशी सुरु होते ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरुची सकाळ

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुही लॉकडाउनमध्ये तिच्या कुटुंबासोबत घरी आहे. घरात राहून ती सध्या विविध गोष्टी करतेय. त्यातच रिंकूच्या मांजरीने गोंडस पिल्लांना जन्म दिला आहे. त्यामुळे या लॉकडाउनमध्ये ती या पिल्लांसोबत वेळ घालवते आहे. दररोज रिंकूची सकाळही या गोंडस पिल्लांसोबत सुरु होते. नुकताच रिंकूने त्यांच्या गोड व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मांजरीची गोंडस पिल्लं पाहायला मिळत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Good morning

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

नुकतच रिंकूने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. घरटं पडल्यामुळे एक पक्षी आणि त्याचं पिल्लू रिंकूच्या घरात आल्याचा व्हिडीओ रिंकूने पोस्ट केला होता. यावरून रिंकूचं प्राणी, पक्ष्यांवर असलेलं प्रेमही पाहायला मिळतय.

रिंकू राजगुरुची पहिली वेब सिरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. ‘हंड्रेड’ या वेब सिरीजमधून रिंकूची वेब प्लॅटफॉर्मवर एन्ट्री झाली असून यातील रिंकूच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive