भाऊंच्या आवाजात 'सूर तेच छेडीता' , कॉमेडी किंग यासाठी बनला गायक

By  
on  

कॉमेडी किंग भाऊ कदमला आपण बहुदा कॉमेडी करताना पाहिलाय. मात्र नुकतच भाऊने गायलं आहे सुरेल गाणं. भाऊचा हा सुरेल अंदाज पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एरवी विविध रुपं करून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा भाऊ यावेळी त्याच्या गाण्याने मंत्रमुग्ध करतोय.  हे गाणं गाण्याचं निमित्त आहे ते म्हणजे एक कार्यक्रम. सारेगमपच्या आगामी कार्यक्रमाच्या प्रोमोसाठी भाऊचा हा सुरेल अंदाज पाहायला मिळाला आहे.  भाऊ सोबत या प्रोमोमध्ये मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सुमीदेखील पाहायला मिळतेय. हे सगळे कलाकार या आगामी सुरेल कार्यक्रमाची आठवण करुन देण्यासाठी आलेत.

‘सारेगमप’ या प्रसिद्ध गाण्याच्या कार्यक्रमाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. आणि याच निमित्ताने ‘लाईव्ह अ थॉन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. सलग 25 तास लाईव्ह गाणी, गप्पांचा हा कार्यक्रम असेल. यात हिंदी, मराठी सारेगमप शोच्या विविध आठवणी आणि गाणी असा हा कार्यक्रम असणार आहे. घरातूनच सगळे कलाकार हा कार्यक्रम करणार आहेत. एवढच नाही तर या कार्यक्रमातून कोरोनाग्रस्तांसाठी मदत निधीही जमा करण्यात येणार आहे.

Recommended

Loading...
Share