'हिरकणी' हा मराठी सिनेमा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या करियरमधील खास आणि महत्त्वाचा सिनेमा आहे आणि तो कायम राहील. या सिनेमाशी जोडलेल्या आठवणीही सोनालीसाठी खास आहे.
या सिनेमाचा रुपदर्शन सोहळा पुण्यात पार पडला होता. यावेळी सोनाली हिरकणीच्या रूपातच सगळ्यांसमोर आली होती. या पत्रकार परिषदेत सोनालीची पालखीतून एन्ट्री झाली होती. आणि याच खास सोहळ्याचे क्षण चित्र सोनाली सोशल मिडीयावर पोस्ट करतेय.
पहिल्या पोस्टमध्ये ती लिहीते की, “भरून हे डोळं आलं, डोळ्यामंदी सपान झालं.. हिराबाई... हिरकणी, रुपदर्शन सोहळ्याच्या आधी चे क्षण, जुनं ते सोनं “
तर दुसऱ्या पोस्टमध्ये सोनाली लिहीते की, “ दिवसाचं दिसत्यात तारं या नभा मंदी....”आणि तिसरा फोटो पोस्ट करत सोनालीने लिहीलं की, “जीव झाला चकवाचांदनं...”
रुपदर्शन सोहळ्याच्या आधीचे हे फोटो सोनालीच्या चाहत्यांनाही प्रचंड आवडले आहेत.