By  
on  

या फोटोत आहे मराठीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री, ...यासाठी पोस्ट केला हा फोटो

 भावना व्यक्त करण्यासाठीही सोशल मिडीया एक माध्यम बनलय. या माध्यमाचा वापर करून आपल्या जवळच्या लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं असो किंवा एखादी खास गोष्ट इतरांसोबत शेयर करणं असो, त्यासाठीही सोशल मिडीयाचा वापर केला जात आहे. त्यातच लॉकडाउनच्या काळात हा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतोय.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे देखील सोशल मिडीयावर सक्रिय असते. नुकतेच प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या बहिणीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिने ही पोस्ट केली आहे. या फोटोंमध्ये प्रार्थनाने तिचा लहानपणीचा फोटोही पोस्ट केला आहे. बहिणीसोबतचा प्रार्थनाचा हा लहानपणीचा फोटो तिच्या चाहत्यांनाही आवडलाय.

 

या पोस्टमध्ये प्रार्थना लिहीते की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी सुपरहिरो, माझा नेहमीचा उपाय आणि माझी दुसरी आई, माझी मोठी बहीण." असं लिहून प्रार्थनाने तिच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive