By  
on  

वर्कआउट उपकरण जोडताना भूषण प्रधानला आली या गोष्टीची आठवण

अभिनेता भूषण प्रधानला फिटनेसची आवड आहे. आणि ही आवड जोपासण्यासाठी तो वर्कआउट करून बरीच मेहनत घेतो. लॉकडाउनच्या काळात भूषणने भूषन वर्कआउट्स असं हॅशटॅग वापरून सोशल मिडीयावर विविध वर्कआउट व्हिडीओही पोस्ट केले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#BhushanBuilds Something that interests me a lot! #BhushanWorkouts just got better

A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan) on

 

नुकतच भूषणने एक नवं वर्कआउट उपकरण घेतले आहे. मात्र ते उपकरण जोडताना त्याला लहानपणीच्या एका खेळाची आठवण झाली आहे. तो लिहीतो की,"याने मला माझ्या मेकॅनिक्स खेळणीची आठवण आली आहे." या उपकरणाच्या सहाय्याने आता भूषणला घरातच वर्कआउट करता येणार आहे. या पोस्टमध्ये भूषण हे उपकरण जोडताना दिसतोय.

भूषण हा मराठी कलाविश्वातील फिट आणि हँडसम स्टारपैकी एक आहे. त्याच्या फिट लुकवर कित्येक तरुणी फिदा आहेत. याशिवय भूषण लॉकडाउनच्या काळात त्याची कुकिंगची आवडही जोपासताना दिसला. त्याचे फोटो आणि व्हिडीओही त्याने पोस्ट केले आहेत. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive