सोनाली कुलकर्णीच्या या गोष्टीला झाली आठ वर्षे पूर्ण, या आठवणीला दिला उजाळा

By  
on  

सोशल मिडीया हे माध्यम सध्या महत्त्वाचं माध्यम बनल आहे. इतर क्षेत्रासह मनोरंजन विश्वासाठीही हा महत्त्वाचा घटक बनला आहे. मनोरंजन विश्वातील बहुतांश कलाकार हे सोशल मिडीयावर सक्रिय आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील विविध सोशल मिडीया साईटवर सक्रिय असते. विशेष करून गेली कित्येक वर्षे ती ट्विटरवरही सक्रिय आहे. तिच्या सिनेमाविषयीच्या गोष्टी पोस्ट करून आणि चाहत्यांसोबत ती तिथे जोडली जाती. आणि याच ट्विटरवर येऊन सोनालीला तब्बल 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. सोनालीने नुकतच ट्विट करून याविषयीची माहिती दिली आहे.

 

ट्विटरवर सोनाली तिच्या चाहत्यांसोबतही बोलतान दिसते. त्यांच्या ट्विटचे रिप्लायही ती करते. तिच्या ट्विटवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.

 

Recommended

Loading...
Share