Exclusive Photos : लग्नसोहळ्यासाठी अशी नटली सई लोकूर, दिसला पेशवाई थाट

By  
on  

अभिनेत्री सई लोकूर आणि तिर्थदीप रॉय यांचा ग्रँड लग्नसोहळा बेळगावात पार पडला. यावेळी परिवार आणि मोजक्याच मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. 

यावेळी सईची लग्नमंडपात ग्रँड एन्ट्री झाली. मग लग्नाचा विधी झाला आणि सई लोकूर झाली मिसेस रॉय. सईच्या या लग्नसोहळ्याचे फोटो आता लक्षवेधी ठरत आहेत.

या ग्रँड लग्नसोहळ्यासाठी सईचा खास लुक पाहायला मिळाला. यावेळी सई पेशवाई साडी लुकमध्ये दिसली. यावेळी सईने गुलाबी हिरव्या काठपदराची साडी नेसली होती. 

बेळगावात सईच्या या लग्नसोहळ्याचे विविध कार्यक्रम पार पडले. लग्नानंतर आता रिसेप्शन सोहळाही तिथेच पार पडणार आहे.

Recommended

Loading...
Share