भारताची ‘पिरियड: एंड ऑफ सेन्टेन्स’ ही डॉक्युमेंट्री ऑस्करच्या शॉर्ट सबजेक्ट विभागातील पुरस्काराची मानकरी ठरली आहे. जगातील सर्वोच्च समजल्या जाणा-या सिनेपुरस्कार म्हणजेच ९१ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपट निर्माती गुनीत मोंगानं भारताला ऑस्कर मिळवून दिला आहे. गुनीत मोंगा यांनी ट्विट करत ऑस्कर मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
‘या धरतीवरील प्रत्येक स्त्रीला ती देवीचा अवतार आहे असं वाटलं पाहिजे. आम्हा सर्वांचा विजय झाला आहे’ अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
या डॉक्युमेंट्रीची निर्मिती गुनीत मोंगा आणि सिखिया एंटरटेनमेंट यांनी संयुक्तपणे केली आहे. या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन इरानी-अमेरिकन फिल्ममेकर रायका जेहबाची यांनी केलं आहे. या डॉक्युमेंट्रीचा कालावधी २६ मिनिटांइतका आहे.
https://twitter.com/guneetm/status/1099864415078363137
उत्तर प्रदेशातील एका गावात सॅनिटरी पॅड व्हेँडिंग मशीन बसवल्यावर तेथील महिला आणि मुलींच्या आसपास ही कथा फिरत राहते. याशिवाय या डॉक्युमेंट्रीमध्ये अरुणाचलम मुरुगनाथम यांची स्वत पॅड निर्मितीची प्रक्रियाही दाखवण्यात आली आहे.