बिग बॉस मराठी 3 : आदिश घराबाहेर गेल्याने प्रेक्षक नाराज, ट्रेंड होतोय हा हॅशटॅग

By  
on  

बिग बॉस मराठी ३ च्या घरात दोन आठवड्यांपूर्वीच पहिल्या वाईल्ड कार्डमुळे एन्ट्री झालेला आदिश वैद्य यावेळेच्या एलिमनेशनमध्ये घराबाहेर पडला. आदिशची घरात दणक्यात एन्ट्री झाली होती. त्याचा खेळही रंगत आला होता. घरात त्याचं एक वेगळंच वलय होतं. कानामागून येऊन तिखट झाला होता.  परंतु, त्याचं एलिमनेशन बिग बॉसच्या प्रेक्षकांना हे फारसं पचनी पडलं  नाही. त्यामुळे सोशल मीडियावर नवा ट्रेण्ड सुरू झाला आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आदिशला परत आणण्याची मागणी केली आहे.

आदिश आणि जय अनेकदा एकमेकांसोबत भांडताना दिसले. सोबतच आदिशने टिम बी ची निवड केल्याने टिम ए मध्ये कुजबुज सुरू झाली. परंतु, आदिशला घरात रुळायला पुरेसा वेळही मिळाला नाही आणि तो घराबाहेर आला. त्यामुळे नेटकरी बिग बॉसवर नाराज झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर #BringBackAdish सुरू झालं आहे.

Recommended

Loading...
Share