By  
on  

या कलाकारांच्या ‘व्हॅलेंटाईन्स डे’ सेलिब्रेशनकडे सगळ्यांचं लक्ष, काही कलाकारांचा पहिला व्हॅलेंटाईन

फेब्रुवारी महिना म्हणजे कपल्ससाठी आवडता महिना. विविध डेज या महिन्यात कपल्स साजरे करतात. त्यातच 14 फेब्रुवारी या तारखेची हे कपल्स वाट पाहत असतात. मात्र सेलिब्रिटीही हा दिवस स्पेशल करण्यासाठी काहीना काही करत असतात. यातच काही सेलिब्रिटींचा यंदाचा व्हॅलेंटाईन हा स्पेशल ठरणार आहे. आणि या सेलिब्रिटींच्या व्हॅलेंटाईन्स डेच्या सेलिब्रेशनकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. 

अभिनेत्री मानसी नाईकने नुकतच तिच्या वाढदिवसाला तिच्या रिलेशशिपविषयी खुलासा केला. आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरासोबत ती रिलेशनशीपमध्ये असल्याचं तिने सोशल मिडीयावर जाहीरपणे सांगीतलं.

त्यामुळे मानसी आणि प्रदीप यांच्या व्हॅलेंटाईन डेचा प्लॅन काय असेल ? आणि दोघं एकमेकांना काय सरप्राईज देतील याकडे सगळयांचं लक्ष असणार आहे. 

अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच दुबईत सुट्टीची मजा लुटून परतली आहे. मात्र यावेळी तिचा कथीत बॉयफ्रेंड कुणाल बेनोडेकरसोबत तिने सुट्टी एन्जॉय केल्याचं समोर आलं. सोनालीने स्वत: तिच्या पोस्टमध्ये कुणालला टॅग केलं होतं. दोघांचं लग्नही याचवर्षी होणार असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे या कपलच्या व्हॅलेंटाईन्स डेच्या सोशल मिडीया पोस्ट आणि सेलिब्रेशनकडेही लक्ष राहणार आहे. दोघांच्या एकत्र फोटोची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. 
 
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्यात प्रेम जुळलं. बिग बॉस शोनंतरही दोघांचं प्रेम आणखी घट्ट होताना दिसत आहे. तेव्हा त्यांचाही यंदाचा व्हॅलेंटाईन हा पहिलाच आहे त्यामुळे तो स्पेशल असेल एवढं नक्की. 

बिग बॉस मराठीच्याच घरात रुपाली भोसले हे नाव चर्चेत आलं होतं. मात्र बिग बॉसच्या घराबाहेर पडताच रुपाली प्रेमात पडली. निर्माता अंकित मागरेसोबत ती सध्या रिलेशनशीपमध्ये आहे. त्यामुळे यंदा व्हॅलेंटाईन डेचं त्यांचं काय सेलिब्रेशन असेल हे पाहणं ही औत्सुक्याचं ठरेल. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive