‘गेम ऑफ थ्रोन्स’ मधील अभिनेत्री डेम डायना रिग यांनी 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By  
on  

‘गेम ऑफ थ्रोन्स’ आणि ‘एवेंजर्स’मधील अभिनेत्री डेम डायना रिग यांचं 82 व्या वर्षी निधन झालं आहे. एका प्रसिद्ध पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार डायनाला कॅन्सर होता आणि काही महिन्यांपुर्वीच त्यांना याविषयी कळलं होतं.  
डायनाची मुलगी रचाएल स्टिरलिंग आईच्या निधनाविषयी सांगते की, “माझी आई आज सकाळी घरी परिवारसमोरच कायमचा शांत झोपेत झोपून गेली.” स्टिरलिंगने सांगीतलं की मार्चमध्ये त्यांना कॅन्सर झाल्याचं समोर आलं आहे. ती सांगते की, “आपल्या शेवटचे दिवस त्यांनी आनंदात घालवले. हसत, खेळत त्यांनी त्यांचं असाधारण जीवन हसत घालवलं. हे सांगायला माझ्याकडे शब्द नाहीत की मला त्यांची किती आठवण येईल.”

 डायना यांच्या निधनावर जेम्स बॉन्ड स्टार जॉर्ज लेझेनबाई ने ट्विट करून लिहीलं की, “डायना रिग यांच्या निधनाविषयी ऐकून आम्हाला खुप दु:ख झालय. एक महान थिएटर आणि स्क्रिन अभिनेत्री”
‘गेम ऑफ थ्रोन्स’’मध्ये डायनाने ओलेना टाइरेल ची भूमिका साकारली होती. त्यांचं हे पात्र चांगलच चर्चेत आलं होतं.  तर ‘द एवेंजर्स’मध्ये त्यांनी एमा पील हे पात्र साकारलं होतं. त्यांची ही दोन्ही पात्र चर्चेत राहिली. 

Recommended

Loading...
Share