By  
on  

PeepingMoon Exclusive: मी माझे सर्व सिक्रेट्स शशांक दादासोबत शेअर करते : दीक्षा केतकर

छोट्या पडद्यावरचा चॉकलेट हिरो शशांक केतकर ह्याने पाहिले न मी तुला या मालिकेत प्रथमच खलनायक साकारत रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. आता शशांकच्या पावलावर पाऊल ठेवत त्याची धाकटी बहिण दीक्षा केतकर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करतेय. दीक्षाची मुख्य भूमिका असलेली ‘तू सौभाग्यवती हो’ ही मालिका सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. न्यूयॉर्कला जाऊन अभिनयाचे रितसर प्रशिक्षण दीक्षाने घेतलं आहे.  निरागस चेहरा, बोलके डोळे यामुळे दीक्षा साकारत असलेली ऐश्वर्या ही नायिका लक्षवेधी ठरतेय. 
 

यंदाच्या रक्षाबंधनानिमित्ताने पिपींगमून मराठीने अभिनेत्री दीक्षाकडून भाऊ अभिनेता शशांक केतकरसोबतच्या अतूट नात्यावर केलेली ही खास बातचित 

 

•    शशांक दादाचं आणि तुझं बॉ़ंडींग कसं आहे?

-    आम्ही सर्वच एकमेकांशी शेअर करतो. कुठली गोष्ट एकमेकांची खटकला तर लगेच सांगतो. कुठंलही दडपण न घेता. खरं तर माणूस म्हणून आम्ही दोघंही खुप वेगळे आहोत. आमच्यातं बॉंडिंग म्हटलं तर बहिण भाऊपेक्षा बेस्ट फ्रेंडसारखं जास्त आहे. आमच्यात सात वर्षांचं अंतर आहे. एकमेकांवर आम्ही आमची मतं कधीच लादत नाही. दोघंही एकमेकांची स्पेस जपतो. 

•    तुम्ही दोघं भांडता का?  ते मिटवण्यासाठी कोण पुढाकार घेतं? 

-    लहानपणी आम्ही खुप भांडायचो. आई-बाबांना भांडू नका भांडू नका म्हणून मध्ये यावं लागायचं. आता नाही तितकं भांडत. पण मी अं मघाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही दोघंही प्रचंड व्यक्तिमत्त्वाचे आहोत, त्यामुळे कधी कधी खटके उडतात. पण मग आम्ही ते एकत्र बसून सोडवतो. दादासोबत भांडण झाल्यावर बोलण्यासाठी मी प्रथम पुढाकार घेते. मला गोष्टी क्लिअर करायला खुप आवडतात. त्यामुळे वाद लवकर मिटतो. 

 

 

•    तुझे सिक्रेट्स तु दादाशी शेअर करतेस का?

-    हो मी माझे सर्वच सिक्रेट्स किंवा जे काही माझ्या आयुष्यात घडतंय त्याबद्दल आधी दादाला सांगते. त्यावर काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याचं मत मला सर्वात आधी त्या गोष्टीवर हवं असतं. मी सर्वकाही त्याला सांगते आणि तोसुध्दा त्याच्या आयुष्यातल्या घडामोडी माझ्याशी शेअर करतो. आम्ही सर्वप्रथम एकमेकांना सांगितल्यानंतर मग ते आई-बाबांपर्यंत पोहचतं. 

•    दादासोबतची एखादी हदयस्पर्शी आठवण सांग?

-     मी अभिनयाचं शिक्षण घेण्यासाटी चार वर्ष न्यूयॉर्कमध्ये होते आणि त्यादरम्यान मी फक्त दोनदा भारतात आले होते. तो काळ मी खुप एन्जॉय केला, पण घरची आणि कुटुंबाची आठवण यायचीच. मला आठवतंय शशांक दादाची पहिली-वहिली फिल्म वन वे तिकीट रिलीज होणार होती. मला त्याचा खुप अभिमान वाटत होता.  सिनेमाचा खुप मोठा ग्रॅण्ड प्रिमीयर होता. घरचे सर्वचजण त्या प्रिमीयरला  जाणार होते. दादासाठी तो क्षण खुप स्पेशल होता आणि मी त्यावेळी कोसो दूर होते. तो प्रिमीयर मी अटेंड करु शकत नाहीए, हे मला सहनच होत नव्हतं. ढसाढसा रडले मी. मला तेव्हा लगेच दादाशी बोलायचंच होतं. इथे भारतात बरीच रात्र झाली होती, तरी मी त्याला फोन केला आणि आम्ही खुप वेळ बोललो, मग मी थोडी सावरले.  
-    

•    तुला शशांक केतकरची कुठली व्यक्तिरेखा जास्त आवडते?

-  दादाच्या सर्व भूमिका सरस आहेत . पण मला त्याची आत्ता अलिकडे त्याने केलेली पाहिले न तुला मी मालिकेतली समर जहागीरदारची व्यक्तिरेखा प्रचंड आवडते, कारण ही खलनायिकी भूमिका त्याने पहिल्यांदाच साकारलीय. खरंतर प्रत्यक्षात तो या भूमिकेच्या टोटल अपोझिट आहे. छान-मनमिळावू असा तो वागतो. असं तो फटकून कोणाशीच वागू शकत नाही. तरीपण ही भूमिका त्याने लिलया पेलली आणि प्रेक्षकांची मनं जिंकली यातच सारं काही आलं. एकदा मी त्याच्या मालिकेच्या सेटवर गेली होती, त्याचा सीन सुरु होता. त्याला असं फटकून वागताना पाहून मलासुध्दा त्याचा खुप राग आला होता, पण हेच त्याच्या भूमिकेचं  य़श आहे. 

 

 

•     या क्षेत्रात येण्यासाठी दादाचं कसं मार्गदर्शन मिळालं?

-    मार्गदर्शन असं नाही म्हणता  येणार, तो मला कधीचे हे कर आणि ते नको असं म्हणत नाही. आम्ही एकमेकांच्या करिअरमध्ये कधीच ढवळा-ढवळ करत नाही. तो माझ्या कामाबाबतीत नेहमीच उत्साही असतो. एखादे मोठे निर्णय असतील, जसे की, आर्थिक तर मी नक्कीच ते दादाला  विचारुन करते. त्याचा सल्ला नक्कीच घेते. तो सतत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive