बहीण प्रिया आहे पल्लवी पाटीलची योगा पार्टनर, दोघी मिळून अशा राहतात फिट

By  
on  

फिटनेसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आणि विशेषकरून योगा हा खूप उपयोगी ठरतो. लॉकडाउनच्या काळात बहुतांश लोक योगा आणि वर्कआउटकडे वळली आहेत. घरातच राहून आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य व्यायाम केला जात आहे. यातच मनोरंजन विश्वातील कलाकारही फिटनेसकडे लक्ष देत आहेत. शिवाय सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध आवाहनही करत आहेत. 

अभिनेत्री पल्लवी पाटीलही लॉकडाउनच्या काळात फिट राहण्यासाठी योगा आणि व्यायाम करत आहे. मात्र यासाठी तिला सोबत असते ती म्हणजे तिची बहीण प्रिया पाटील हिची. दोघी एकत्र मिळून योगा करतात. नुकताच पल्लवीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात दोघी एकत्र मिळून योगा करताना दिसत आहेत. 

सध्या लॉकडाउनच्या काळात कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची संधी ही मिळाली आहे. याच वेळेचा सदुपयोग करून बहिणीसोबत वेळ घालवत पल्लवी  अशाप्रकारे फिट राहण्याचही आवाहन करत आहे.

Recommended

Loading...
Share