By  
on  

पाहा Video : बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृत निवड झालेल्या 'बिटरस्वीट' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा मराठी सिनेमा 'बिटरस्वीट' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाची बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृत निवड झाली आहे. याशिवाय जिसेक पुरस्कारासाठीही या सिनेमाचं नामांकन झालं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री स्मिता तांबे आणि अक्षया गुरव पाहायला मिळत आहेत.

महिला ऊस तोड कामगार यांच्या जीवनावर बेतलेली ही कथा आहे. या कामगारांचे होणारे शोषण आणि त्यांच्या अस्तित्त्वाचा लढा याचे चित्रण या सिनेमात आहे. या मराठी सिनेमाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील उडी कौतुकास्पद आहे. क्वेस्ट फिल्मसने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात अक्षया गुरव, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, गुरु ठाकूर, असित रेडीज, विनायक दिवेकर, स्मिता तांबे मुख्य भूमिकेत दिसत आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive