बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच वादाचा विषय असतो. या शोमध्ये जे काही घडतं, बोललं जातं त्याचा वाद आणि चर्चा होताना दिसलं आहे. मात्र याच कार्यक्रमातील स्पर्धक जान कुमार सानूने असं काही विधान केलं ज्याने शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष त्याच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. जान हा प्रसिद्ध गायक कुमान सानू यांचा मुलगा आहे. याच कार्यक्रमातील स्पर्धक निकी तांबोळी आणि राहुल वैद्य यांच्यात मराठी संभाषण सुरु होते. त्यादरम्यान जानने मराठी भाषेचा अवमान केल्याचं निदर्शनास आलं. यावर शिवसेने चित्रपट सेनेचे आदेश बांदेकर यांनीही आक्षेप घेतला आहे.
आदेश बांदेकर यांनी सोशल मिडीयावर संताप व्यक्त करून माफीची मागणी केली होती.
बिग बॉस च्या व्यवस्थापनाने व ह्या व्यक्ती ने महाराष्ट्राची व मराठी जनतेची त्वरित माफी मागावी ज्यानी हे कृत्य केले त्याची तातडीने हकालपट्टी करावी... अशी बदनामी करणाऱ्यांची चित्रीकरण परवानगी महाराष्ट्र शासनाने रद्द करावी... शिवसेना चित्रपट सेना
— Adesh Bandekar - आदेश बांदेकर (@aadeshbandekar) October 28, 2020
त्यानंतर आता कलर्स वाहिनीने माफीनामा जारी केला आहे. कलर्स वाहिनीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र पाठवून माफी मागीतली आहे. या माफीनाम्यात म्हटलं गेलं आहे की, "आम्ही आक्षेपाची नोंद घेतली आहे आणि यावर उपाय म्हणून तो संवाद असलेल्या एपिसोडचा तो भाग पुढील टेलेकास्टमधून काढणार आहोत. जर त्या एपिसोडमुळे महाराष्ट्रातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही माफी मागतो. आम्हाला प्रेक्षकांचं महत्त्व आहे, यासह आम्ही मराठीसह भारतातील इतरही भाषांचा आदर करतो"
मराठीचा अवमान कदापी सहन करणार नाही...कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांची माफ़ी मागितली....चूक पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी...शिवसेना चित्रपट सेना@CMOMaharashtra @AUThackeray @Iamrahulkanal pic.twitter.com/EL34IpTMEE
— Adesh Bandekar - आदेश बांदेकर (@aadeshbandekar) October 28, 2020
वाहिनीने हा माफीनामा पाठवला असला तरीही आता अशाप्रकारची चूक पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेण्याचा इशारा आता आदेश बांदेकर यांनी दिला आहे. यासह मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही या मराठी भाषेच्या अपमान प्रकरणावर आक्षेप व्यक्त केला आहे.