By  
on  

'रुद्रकाल'च्या थरारनाट्यात झळकणार हे मराठी कलाकार

दशमी क्रिएशन निर्मित आणि सुकृती त्यागी दिग्दर्शित 'रुद्रकाल' ही रहस्यमय मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही कथा आहे एका प्रकरणात अडकलेल्या बंडखोर पोलिसाची आणि त्याच्या कुटुंबाची. या प्रकरणातून बाहेर पडतानाचा त्यांचा प्रवास या मालिकेत दाखवण्यात आला आहे. 

या मालिकेविषयी निर्माते नितीन वैद्य सांगतात की, ''शहरात दर दिवशी सामोरे जावे लागणाऱ्या तसेच सद्यस्थितीतील विविध समस्यांना यानिमित्ताने स्पर्श करण्यात आला आहे. कायद्यात राहून मालिकेतील पात्र या समस्यांचा कसा सामना करेल, हे रुद्रकालमध्ये दाखवण्यात आले आहे."  

येत्या डिसेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या थरारनाट्यात भानू उदय, दीपांनीता शर्मा आणि रुद्राक्ष जैस्वाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेचं मुख्य आकर्षण म्हणजे या मालिकेत काही उत्तम मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. या मालिकेत अभिनेत्री श्रुती मराठे, स्वानंद किरकिरे, किशोर कदम या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.  नुकतीच या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive