By  
on  

पाहा Photos : अभिनेत्री पूजा सावंतचा या लाँग गाउनमध्ये दिसला सुंदर लुक

अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी सिनेविश्वातील स्टाईल आयकॉनपैकी एक मानली जाते. तिचे आउटफीट्स, फोटोशुट हे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच पूजाने तिचे काही सुंदर फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

सोशल मिडीयावर पूजाचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांनाही तिचे हे फोटो प्रचंड आवडतात. या फोटोंना मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत असतात. पूजाने नुकताच लाँग गाउन लुक केला होता. या सुंदर गाउनमध्ये फक्त गळ्यात डायमंड नेकपीस असा हा लुक होता. या लुकमध्ये पूजा गॉर्जियस दिसतेय. फोटोग्राफर श्रुती बागवेने पूजाचे हे सुंदर फोटो कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

अशा पद्धतिचे लुक पूजा नेहमीच सहज सुंदर पद्धतिने सांभाळताना दिसते. 

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या नव्या डान्स रिएलिटी शोमधून पूजा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये पूजा परिक्षकाची धुरा सांभाळेल. येत्या 30 नोव्हेंबरपासून हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive