By  
on  

धडाकेबाज 'दादला बुलेटवाला...' संगीतप्रेमींच्या भेटीला, पाहा Video

मराठी सिने आणि संगीतसृष्टीनं नेहमीच जागतिक पातळीवर अलौकिक कामगिरी करीत जगभरातील संगीतरसिकांच्या मनावर अधिराज्य मराठीचा झेंडा फडवकत ठेवला आहे. यात मराठमोळ्या ठेक्यांवर ताल धरायला लावणाऱ्या चित्रपटगीतांपासून अल्बम आणि सिंगल्सच्या माध्यमातून सर्वसामान्यांमधील डान्सरला मनमुराद नृत्य करायला लावणाऱ्या सर्वच गीतांचा मोलाचा वाटा आहे. हीच परंपरा पुढे सुरू ठेवत 'दादला बुलेटवाला...' हे धमाकेदार मराठी गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला आलं आहे. कोरोनाची गडद छाया धूसर होत असताना ऐन लग्नाच्या हंगामात आलेलं 'दादला बुलेटवाला...' हे सिंगल अबालवृद्धांना ठेका धरायला लावणारं आहे.

सिग्नेचर ट्युन्स आणि एबी एन्टरटेन्मेंटची संयुक्त प्रस्तुती असलेलं 'दादला बुलेटवाला...' हे गाणं बऱ्याच वैशिष्ट्यांमुळं लाँच होताच चर्चेत आलं आहे. भक्ती तुषार दळवी आणि निखिल चंद्रकांत पाटील यांची निर्मिती असलेल्या या गाण्याचं दिग्दर्शन आाणि कोरिओग्राफी अमित बाईंग यांनी केली आहे. या गाण्याचं खास आकर्षण आहे सुशांत पुजारी... सुशांत पुजारी हे नाव एव्हाना सर्वांच्याच चांगलं परिचयाचं झालं आहे. दिग्दर्शक-कोरिओग्राफर रेमो डिसूझांच्या 'एबीसीडी', 'एबीसीडी २', 'स्ट्रीट डान्सर' या हिंदी सिनेमांमध्ये सिनेरसिकांनी सुशांतच्या डान्सची जादू पाहिली आहे. आता 'दादला बुलेटवाला...' बनून प्रथमच तो मराठीत आपला जलवा दाखवत आहे. सुशांतचा हा पहिलाच अल्बम मराठी भाषेत असणं हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. या गाण्यात सुशांतच्या जोडीला अमृता फडकेचं नृत्य आणि सौंदर्य लक्ष वेधून घेत आहे. सिग्नेचर ट्युन्सचं 'दादला बुलेटवाला...' हे पहिलंच मराठी गाणं याच युट्युब चॅनलवर आॅनलाईन लाँच करण्यात आलं आहे.

डीओपी अभिजीत पाटील यांनी 'दादला बुलेटवाला...'ची सिनेमॅटोग्राफी केली आहे. गीतकार-संगीतकार श्रेयस यांनी हे गीत लिहिलं असून, कविता राम यांच्यासोबत स्वत: गात त्यांनी संगीतबद्धही केलं आहे. श्रेयसनं यापूर्वी 'तिचा उंबरठा', 'गावठी (गुठून जीव... आणि भन्नाट...)', 'ट्रकभर स्वप्नं' या मराठी सिनेमांसाठी संगीत दिलं आहे. 'गावठी'मधील 'गुठून जीव...' या गाण्यासाठी श्रेयसला सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि पुरुष पार्श्वगायकाची नामांकनंही मिळाली होती. श्रेयसच्या संगीतानं सजलेले 'सलमान सोसायटी', 'कोंडी', 'रावस' आणि 'देवाक काळजी' हे आगामी मराठी सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१५ मध्ये श्रेयसनं बीसीसीआय इंडीयासाठी गाणं बनवलं होतं. श्रेयसनं संगीत दिग्दर्शित केलेलं 'तुटलेत सारे आधार...' हे शेतकरी गीतही चांगलंच चर्चेत राहिलं होतं.

'दादला बुलेटवाला...'चं दिग्दर्शन आणि कोरिओग्राफी करणारे अमित बाईंग १९९६ पासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असून आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive