By  
on  

पाहा Video : 'तुझ्यात जीव रंगला'च्या सेटवर राणाने जीजासोबत अशी केली होती मस्ती

'तुझ्यात जीव रंगला' या प्रसिद्ध मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र या मालिकेचे चाहते या मालिकेतील त्यांच्या आवडत्या पात्रांना मिस करत असतील एवढं नक्की. मात्र ही मालिका जरी संपली असली तरी आता सोशल मिडीयावर या मालिकेतील कलाकार काही आठवणींना उजाळा देत आहेत. 

या मालिकेत अंजली बाई आणि जीजाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर सध्या सोशल मिडीयावर या मालिकेच्या आठवणींना उजाळा देत आहे. अक्षयाने नुकताच एक विनोदी व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत राणा आणि जीजा डान्स करताना दिसत आहेत. मात्र डान्स करताना राणाचा विनोदी अंदाज पाहायला मिळतोय. अक्षया आणि हार्दिक जोशीचा हा कॉमेडी व्हिडीओ नेटकऱ्यांनाही आवडतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

या व्हिडीओत राणा आणि जीजाचा सुरुवातीला रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय, मग त्यानंतर राणा गंमत करतो आणि हा रोमँटिक व्हिडीओचं रुपांतर कॉमेडी व्हिडीओत होताना दिसतय. 

ही मालिका सुरु झाल्यापासूनच या मालिकेचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. हे चाहते त्यांच्या राणादा आणि जीजावरही भरभरुन प्रेम करतात. त्यामुळे या व्हिडीओवरही लाईक्सचा वर्षाव झाला आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive