नुकतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7 जूनपासून पाच टप्प्यातील अनलॉकची घोषणा केली आहे. राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असताना मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूचना जारी केली आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जातील. यामुळे मनोरंजन क्षेत्रात काम करणारे कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक, वाहिन्या या सगळ्यांनाचा मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे चित्रीकरणाला बंदी होती. त्यामुळे अनेक चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर सुरु होते. निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ यांचेही हाल होत होते. लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रासह मनोरंजन विश्वाव काम करणाऱ्यांना सुद्धा विविध अडचणींना सामोरं जावं लागत होतं. ही घोषणा इतर क्षेत्रासह मनोरंजन क्षेत्रासाठीही दिलासादायक ठरतेय.
Level of restrictions for breaking the chain pic.twitter.com/Vi8WvkDuqi
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 4, 2021
या घोषणेत मनोरंजन विश्वासाठी अनेक दिलासादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यात थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे नियमितपणे तर काही ठिकाणी 50 % क्षमतेने सुरु होणार आहेत. यात काही जिल्ह्यात चित्रीकरण करता येण्याची मुभा देण्यात आली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीची मर्यादा असेल. तर स्टुडियोत चित्रीकरण परवानगी मात्र सोमवार ते शनिवार करता येईल. विविध टप्प्यात विभागून दिलेल्या जिल्ह्यामध्ये हे नियम लागू असतील. मुंबई, ठाणेसह नाशिक जिल्ह्यात चित्रीकरणाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.