पाहा Photos : या खास व्यक्तिसोबत नेहा पेंडसेने साजरा केला तिचा वाढदिवस

By  
on  

अभिनेत्री नेहा पेंडसे बायसचा आज वाढदिवस असल्याने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.सोशल मिडीयावर नेहाला वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा मिळत आहेत. याशिवाय नेहाचा पती शार्दुल बायसने देखील तिला खास सरप्राईज दिल्याचं पाहायला मिळतय. 

नेहाने तिचा वाढदिवस तिच्या पतीसोबत सेलिब्रेट केलाय. या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 

या व्हिडीओत नेहा केक कटिंग करताना दिसत आहे. तिच्यासोबत शार्दुलही व्हिडीओत दिसतोय. शिवाय नेहाच्या चेहऱ्यावर या सेलिब्रेशनचा आनंद झळकतोय. नेहाचे शार्दुलसोबतचे रोमँटिक फोटोही या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहेत. या खास सेलिब्रेशनसाठी नेहा हटके पेहरावात दिसली. निळ्या रंगाचा शायनिंग आउटफिट तिने परिधान केला होता.

2020 मध्ये जानेवारी महिन्यात नेहा पुण्यात शार्दुलसोबत विवाहबंधनात अडकली होती. नेहाने आत्तापर्यंत विविध मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलय. 'भाभाजी घर पर है' मालिकेत ती सध्या अनीता भाभीची भूमिका साकारतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

 

Recommended

Loading...
Share