By  
on  

पाहा Photos : ऋता दुर्गुळेच्या हातावर चढली मेहंदी, प्रतिक शाहसोबत करणार साखरपुडा

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा सुरु होती. यातच ऋताने ती प्रेमात असल्याची कबुली सोशल मिडीयावर दिली. बॉयफ्रेंड प्रतिक शाहसोबतच्या नात्याचा ऋताने खुलासा केला. सध्या सोशल मिडीयावर ऋता आणि प्रतिक ही जोडी चर्चेत आहे.

यातच आता दोघं साखरपुडा करणार असल्याचं समोर आलय. एवढच नाही तर ऋताने साखरपुड्याची खास तयारी देखील केली असल्याचं दिसतय. ऋताच्या हातावर प्रतिकच्या नावाची सुंदर मेहंदी चढली आहे. 

साखरपुड्यासाठी ऋताने खास तयारी केली असून सोशल मिडीयावर तिचे तयारीचे फोटो, व्हिडीओ चर्चेत आले आहेत. हातावर सुंदर मेहंदी चढल्याचे फोटोही ऋताने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. या मेहंदीसाठी ऋतासोबत अभिनेत्री शाल्मली टोळ्ये देखील दिसतेय. 

ऋता आणि प्रतिकचा साखरपुडा लवकरच संपन्न होणार असून या नात्याची नवी सुरुवात होणार आहे. साखरपुड्यानंतर दोघांचं लग्न कधी होईल या चर्चांना देखील उधाण येईल यात शंका नाही. प्रतिक हा हिंदी मालिकांसाठी दिग्दर्शन केलय. हिंदी टेलिव्हिजन विश्वात लोकप्रिय मालिकांचा दिग्दर्शक म्हणून त्याची ओळख आहे. शिवाय तो प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive