By  
on  

पाहा Video : सोनाली कुलकर्णीसोबत पती कुणालचा 'बुरुम बुुरुम' डान्स

'पांडू'या चित्रपटाला मागील वर्षापासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि सोनाली कुलकर्णी झळकत असलेल्या या चित्रपटातील गाणीही चर्चेत आहेत. या चित्रपटातील बुरुम बुरुम हे गाणं तर प्रचंड लोकप्रिय ठरलय. सोशल मिडीयावर या गाण्यावर विविध डान्स व्हिडीओ केले जात आहेत.

 

एकिकडे सोशल मिडीयावर हे गाणं चर्चेत असताना सोनालीने देखील या गाण्यावर खास डान्स व्हिडीओ केलाय. मात्र तिने हा डान्स केलाय चक्क पती कुणालसोबत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सोनालीने सोशल मिडीयावर या गाण्याचा हा व्हिडीओ शेयर केलाय.

नव्या वर्षात सुट्टीची मजा लुटताना निसर्गरम्य वातावरणात पती कुणालसोबत सोनालीने या गाण्यावर डान्स केलाय. कुणालनेही सोनालीला छान साथ दिलीय. सोशल मिडीयावर सोनालीच्या चाहत्यांनी या व्हिडीओला पसंती दिली असून हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. मागली वर्षी 2021 मध्ये सोनाली आणि कुणालने दुबईत लगीनगाठ बांधली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive