'मुलगी झाली हो' या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने हे सोशल मिडीयावरील त्यांच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असतात. आजवर विविध नाटकांमध्ये काम केलेले किरण माने हे विलास पाटीलांच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. यातच त्यांनी नुकतीच केलेली फेसबुक पोस्ट चर्चेचा विषय ठरलीय.
किरण माने यांनी नुकतच फेसबुकवर असं लिहीलय की, "एक किंवा दोन प्रेक्षक थेटरात असतानाबी आमी कधी घाबरून नाटकाचा प्रयोग रद्द केला नाय ! हाऊसफुल्ल असल्यागत रेटून प्रयोग करूनच घरी परत आलो..दम हाय छातीत भावा."
किरण माने यांची ही पोस्ट पाहुन मानेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधल्याचं म्हटलं जातय. मोदींच्या पंजाब दौऱ्यावर झालेल्या घटनेवर मार्मिक टिप्पणी केल्याचं म्हटलं जातय. सोशल मिडीयावर किरण माने यांच्या पोस्टवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.
किरण माने हे नाटक, मालिका, चित्रपट या व्यतिरिक्त राजकीय आणि सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या पोस्टही सोशल मिडीयावर करत असतात. त्यामुळे त्यांची ही पोस्टही सोशल मिडीयावर गाजतेय.