By  
on  

पाहा Photos : ऋता आणि प्रतिकच्या साखरपुड्याचे हे फोटो देत आहेत #Couplegoals

नुकताच अभिनेत्री ऋता दुर्गुळेचा साखरपुडा संपन्न झाला. काही दिवसांपूर्वी ऋताने ती प्रेमात असल्याचा खुलासा केला होता. दिग्दर्शक प्रतिक शाहसोबतच्या नात्याचा खुलासा करत ऋताने हे नातं सोशल मिडीयावर समोर आणलं होतं. काही दिवसांपूर्वी ऋता आणि प्रतिकचा साखरपुडाही पार पडला. हा साखरपुडा सोहळा जणू एकाद्या सिनेमापेक्षा कमी नव्हतं. प्रतिकने गुडघ्यावर बसून ऋताला अंगठी घालणं असेल किंवा या सोहळ्यातील ऋता-प्रतिकचा डान्स असेल. या सगळ्याच गोष्टी लक्षवेधी ठरल्या होत्या.

याच साखरपुड्याचे आणखी काही सुंदर फोटो समोर आले आहेत. प्रतिकने त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर हे फोटो शेयर केले आहेत. 

ऋता आणि प्रतिकचा रोमँटिक अंदाज या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहेत. 

हे दोघही गोड कपल चांगलेच कपल गोल्स देताना दिसत आहेत. सोशल मिडीयावर ऋता आणि प्रतिकची ही जोडी चांगलीच चर्चेत असून या जोडीला चाहत्यांचं प्रेम मिळतय. 

ऋता ही मराठी नाटक, मालिका, चित्रपट क्षेत्रात अभिनेत्री म्हणून काम करते तर प्रतिक हा हिंदी मालिकांसाठी दिग्दर्शक म्हणून काम करतो. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive