By  
on  

विजू माने यांनी या कारणासाठी केलं सोनाली कुलकर्णीचं कौतुक,म्हटले "मी सोनालीबद्दल थोडं वाईटच ऐकून होतो"

दिग्दर्शक विजू माने दिग्दर्शित पांडू या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सोनाली कुलकर्णी झळकत असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. यातच या यशाच सेलिब्रेशन म्हणून दिग्दर्शक विजू माने हे सोशल मिडीयावर दररोज एक पोस्ट करून प्रत्येकाचे आभार मानताना दिसत आहेत. नुकतीच त्यांनी सोनाली कुलकर्णीसाठी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सोनाली कुलकर्णीचं कौतुक केलं आहे.

विजू माने लिहीतात की, "पांडूच्या कास्टिंग बद्दल चर्चा सुरू असताना अचानक अश्विन पाटील ने तिचे नाव काढलं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर तिचं नाव येताक्षणी मी हंड्रेड पर्सेंट कन्व्हिन्स्ड नव्हतो. पण झी स्टुडीओज् चे सर्वेसर्वा मंगेश कुलकर्णी आणि अश्विन यांनी मला पटवून दिलं. मी कन्व्हीन्स नसण्याचं कारण मला स्टार पदाला पोहोचलेल्या नट्यांचे नखरे आवडत नाहीत. सिनेमातल्या कॅरेक्टर पेक्षा यांच्या कॅरेक्टरवर अधिक बोललं जातं. सगळ्या पर्यायांमधून शेवटी एकदाचं तिचं कास्टिंग झालं, सिनेमा झाला,आणि ही पोरगी आपली एकदम झक्कास मैत्रीण झाली."

या चित्रपटाच्या निमित्ताने सोनालीविषयीचा गैरसमजही दूर झाला असल्याचे विजू माने यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. "सोनाली कुलकर्णी...खरंच स्टारपद असलेल्या हीरोइन बद्दल बऱ्या-वाईट चर्चा कायमच होत असतात. तो त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे. पण मी सोनालीबद्दल का कोण जाणे थोडं वाईटच असं ऐकून होतो. सेटवर खूप त्रास देते, दिग्दर्शकाला स्वतःच्या सूचना देते. पहिला दिवस शूटिंगचा येईपर्यंत मला सतत असं वाटायचं, की माझ्या आणि तिच्यात सेटवर खटके उडणार. पण to my surprise सेट वरच्या पहिल्या शॉट पासून ते प्रमोशन च्या शेवटच्या दिवसापर्यंत आमच्यात वादाचा असा मुद्दाच आला नाही. मुळात ती माझ्या अपेक्षेपेक्षा अत्यंत वेगळी होती. सेटवर कधीही एक सेकं देखील उशिरा पोहोचली नाही. उलट दिलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटे तरी आधी ती कुठेही हजर असते. मग ती मीटिंग असो, शिबिर असो, फोटोसेशन असो, डान्स असो, किंवा शूटिंग असो. आपण सेटवर असताना इतर कुठल्याही गप्पा न मारता, केवळ आपल्या सिनेमातील कॅरेक्टरबद्दल गप्पा मारायची."

ते पुढे लिहीतात की, "खरंतर, उषा कॅरेक्टरचे कॉश्च्युम डिझाइन करताना तिने खूप जास्त मेहनत घेतली आहे. उषाच्या नाकातल्या nosering पासून, ते तिच्या साडीच्या पदराला असलेल्या गाठीपर्यंत तिने स्वतः विचारविनिमय करून बनवल्यात. प्रसंगी स्वतःचे कपडेदेखील तिने सिनेमात वापरले आहेत. शिवाय वजन कमी करून ती गाण्यात लाजवाब दिसली आहे. सिनेमासाठी passionately काम करणारी अभिनेत्री आहे ही. आणि जितकी सिनेमाच्या रोल बाबतीत गंभीर, तितकीच सेटवरच्या कुरापती मध्ये लबाड आणि खट्याळ. एखाद्याचा आपण पाणउतारा केलाय हे त्याला नकळता आजूबाजूच्यांना दाखवून देण्याची तिच्यात 'विशेष' कला आहे. तिच्या आणखी एका गोष्टीचं फार अप्रूप वाटतं, ते म्हणजे प्रोफेशनलिझम. आपला हा सिनेमा सुरू असतानाच आपल्या वक्तशीर आणि 'जेवढ्यास तेवढ्या' वागण्याने अख्या युनिटच्या माणसांना आपलंसं करणे तिला करेक्ट जमतं. तिचे मार्केटिंग इतक्या सोप्या आणि बेमालूम पद्धतीने करते की पुढच्या सिनेमाचा विचार करताना एखादा दिग्दर्शक तिचा नक्कीच सगळ्यात आधी विचार करेल. ( ही माझ्यासहित सर्वांनाच शिकण्यासारखी गोष्ट आहे.) या यशाच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण 'सोनाली कुलकर्णी' सुद्धा आहे. थँक्यू सोनाली या प्रोजेक्टचा विशेष भाग झाल्याबद्दल. बाकी थोडा कुचकटपणा कमी केलास तर तू उत्तम माणूस आहेस."

 सोनालीने ही पोस्ट पाहताच विजू माने यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. सोनालीने लिहीलय की, "धन्यवाद सर… खूपंच इंटरेस्टिग वाटलं…आपल्याबद्दल दुसऱ्या व्यक्तिचं इतकं सविस्तर निरिक्षण वाचायला. माझ्याबद्दल जे काही ऐकलं होतं त्यापेक्षा तुम्ही वेगळं अनुभवलं…मला ही पांडू च्या निमित्ताने तुमच्या बरोबर काम करताना फार मजा आली. अभिनेत्री म्हणून काही नवीन गोष्टी करता आल्या. आणि माणूस म्हणून नवीन माणसांशी मैत्री झाली. अजून काय लागतं चित्रपट चांगला बनायला आणि यशस्वी व्हायला…. चांगली पॉझिटीव्ह आणि ती कॅप्टन ऑफ शीप पासून सुरु होते. पुढे ५० दिवसांच्या सेलिब्रेशनला आणखी बोलूच."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive