पाहा Photos : या मंडळींच्या उपस्थितीत सुयशने साजरा केला वाढदिवस

By  
on  

अभिनेता सुयश टिळकच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर चाहत्यांसह त्याच्या मित्रमंडळींना त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यातच सुयशच्या वाढदिवसानिमित्ताने त्याची पत्नि आयुषीकडूनही त्याला खास शुभेच्छा मिळाल्या आहेत. आयुषीने सोशल मिडीयावर दोघांचा खास फोटो शेयर केला आहे. आय लव्ह यू म्हणत तिने सुयशला शुभेच्छा दिल्या आहेत. 

तर आयुषी आणि अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्यासोबत सुयशने त्याचा वाढदिवस साजरा केलाय. सुयशने त्याच्या वाढदिवसाचा सेल्फिदेखील सोशल मिडीयावर पोस्ट केलाय.

तर दुसरीकडे हर्षदा खानविलकर यांनी सुयशसोबतचे फोटो शेयर करत त्याला शुभेच्छा दिल्यात. 

मागील वर्षी 2021मध्ये सुयश आणि आयुषीने लगीनगाठ बांधली होती. त्यामुळे लग्नानंतरचा त्याचा यंदाचा पहिला वाढदिवस असून तो पत्निसोबत साजरा करत आहे. त्यामुळे यंदाचा वाढदिवस सुयशसाठी खास आहे एवढं नक्की.

Recommended

Loading...
Share