'पांडू' या चित्रपटाने आणि चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलय. सोशल मिडीयावर तर या चित्रपटातील गाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या चित्रपटातील गाणी आणि डायलॉगवर विविध डान्स व्हिडीओही केले जात आहेत. त्यातच सोनाली कुलकर्णीने चाहत्यांना एक नवं डान्स चॅलेंज दिलय. हे डान्स चॅलेंज आहे बुरुम बुरुम गाण्यावर. हे गाणं सध्या सोशल मिडीयावर चर्चेत असताना या गाण्यावर नवा डान्स चॅलेंज सोनाली घेऊन आलीय.
या डान्स चॅलेंजसाठी सोनालीने तिचा भाऊ अतुल कुलकर्णीसोबत धमाल डान्स केला आहे. अतुलसोबत बाईकवर बसून मग नंतर त्यांच्यासोबत झक्कास स्टेप करत सोनालीने हे नवं चॅलेंज दिलय. सोनाली आणि अतुलचा हा डान्स व्हिडीओ चांगलाच लक्षवेधी ठरतोय. बहीण - भावाची ही जोडी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
सोनालीचा भाऊ अतुल हा एक उत्तम डान्सर आहे. शिवाय अतुल हा मॉडेलींगमध्ये त्याचं नावलौकिक करतोय. सोशल मिडीयावर त्याची स्टाईल आणि डान्स चर्चेत आहे. त्याचाही एक मोठा चाहतावर्ग सोशल मिडीयावर असून मॉडेलींग क्षेत्रात त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.