By  
on  

महेश मांजरेकरांचा 'नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दृश्यांवर घेतला आक्षेप

प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा 'नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा' हा चित्रपट सध्या चर्चेत आलाय. या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनापासूच हा चित्रपट चर्चेत आहेत. मात्र प्रदर्शनाआधीच हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. येत्या 14 जानेवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे मात्र त्याआधीच या चित्रपटासंदर्भातला वाद समोर आलाय.

 

या चित्रपटातील ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलेल्या काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आलाय. राष्ट्रीय महिला आयोगाने यावर आक्षेप घेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाकडे तक्रार नोंदवली आहे. ट्रेलरमध्ये अनेक लैंगिक दृश्ये, हिंसक दृश्ये आहेत. तसेच या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अल्पवयीन मुलगा आणि महिलेची आक्षेपार्ह स्थितीतली दृश्यही दाखवण्यात आली आहेत. यावर राष्ट्रीय महिला आयोगाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. तेव्हा या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच घेण्यात आलेल्या आक्षेपाचे परिणाम काय असतील हे लवकरच समोर येईल.

 

हा सिनेमा दिवंगत ज्येष्ठ नाटककार आणि पत्रकार जयंत पवार यांनी लिहिलेल्या ‘वरन भात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथेवर आधारित आहे. महेश मांजरेकर यांनी या सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive