By  
on  

'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित.. पुष्कर, सोनाली, आशयचा हटके लूक

'व्हिक्टोरिया' या चित्रपटातून अभिनेता पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी आगळ्या वेगळ्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पुष्कर आणि सोनाली पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. 

नुकताच या चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आलाय. यात पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके लुक पाहायला मिळतोय. हा एक रहस्यमयी चित्रपट असून या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण हे स्कॉटलँडला होणार आहे. 

या चित्रपटातून अभिनेता पुष्कर जोगचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता पुष्कर जोग पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारताना पाहायला मिळेल. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून कलाकारांच्या हटके फर्स्ट लूक लक्षवेधी ठरले आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive