By  
on  

लता दीदींच्या स्वास्थ्यासाठी 'सारेगमप'च्या टीमने घातली पूजा

गेल्या काही दिवसांपासून गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर या उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र मंगेशकर कुटुंबियांच्या माहितीनुसारी काही चाचणीसाठी त्यांचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आल्याचं सांगण्यात आलं होतं. तरीही लतादीदी अद्याप आयसीयूमध्येच असून त्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.

लता दीदींच्या स्वास्थ्यासाठी आणि त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी अनेक ठिकाणी होम हवन, पूजा केल्या जात आहेत. 'सारेगमप' या कार्यक्रमाच्या टीमनेही लता दीदींची प्रकृती सुधारावी यासाठी पूजा घातली होती. यावेळी सारेगमपची संपूर्ण टीम उपस्थित होती आणि लता दीदींच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करताना दिसली.

एवढच नाही तर अयोध्येतही लता मंगेशकर यांची प्रकृती सुधारावी यासाठी पूजा अर्चा करण्यात आलीय. लतादीदींचे असंख्य चाहते त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive