भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. मुंबईतील प्रभुकुंज या त्यांच्या राहत्या घरी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे.
बिग बी अमिताभ बच्चन देखील मुलगी श्वेतासोबत प्रभुकंजवर दाखल झाले आहेत. अमिताभ बच्चन आणि लता दीदींचे अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. त्यामुळे लतादीदींच्या निधनाची बातमी कळताच बिग बी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या व्यतिरिक्त संजय लीला भंसाळी, अनुपम खेर, आशुतोष गोवारीकर, जावेद अख्तर हे देखील लता दीदींच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले आहेत.