By  
on  

एका ऑडिशनसाठी हेमांगी कवीने केला होता लतादीदींसारखा लुक , म्हणते "निदान लुक मधून साकारता आल्याचा आनंद..."

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी रोजी जगाचा निरोप घेतला आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. लतादीदींच्या निधनाने देशासह जगभरातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेकांनी दीदींना श्रद्धांजली वाहिली तर काहींनी दीदींच्या आठवणींना उजाळा दिलाय. 

अभिनेत्री हेमांगी कवीनेही दु:ख व्यक्त करत खऱ्या अर्थाने मैफिल सुनी सुनी झाल्याचं म्हटलय. शिवाय एक फोटोही शेयर केलाय. या फोटोत हेमांगीने लतादीदींसारखा लुक केलाय. हा लुक तिने एका ऑडिशन आणि लुकटेस्टसाठी केला होता. त्याचाच हा फोटो आहे.

 

हेमांगी या पोस्टमध्ये लिहीते की, "दोन तीन वर्षांपूर्वी एका प्रोजेक्ट निमित्त लताजींच्या भूमिकेसाठी मी एक ऑडिशन कम लुकटेस्ट दिली होती. ते प्रोजेक्ट उदयास आलं नाही पण अगदी काही क्षणांसाठी त्यांचं अनुकरण, गाण्यातून नाही (जे खरंतर माझ्यासारख्या अति सामान्य कलाकारासाठीच काय तर कुठल्याच जन्मात कुणालाही अशक्यप्राय अशी गोष्ट आहे) पण निदान लुक मधून साकारता आलं याचा मला काय तो आनंद झाला होता उफ्फ....! खूप मनापासून हा लुक मी करून गेले होते! वो एक आंसू आपके लिए छुपा के रखा था और हमेशा रहेगा!  मैं, मेरी आँखे हमेशा आपके लिए तरस्ती रहेंगी!"

हेमांगीने ज्या प्रोजेक्टसाठी हा लुक केला होता तो उदयास आला नसला तरी यानिमित्ताने लतादीदींचा लुक करताना आनंद झाला असल्याचं तिने या पोस्टमध्ये लिहीलय. शिवाय दीदींना श्रद्धांजली वाहिलीय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive