By  
on  

‘झुंड’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये झळकतायत सैराटचे आर्ची आणि परश्या 

नागराज मंजुळे दिग्दर्शित महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भुमिका असलेला 'झुंड' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शिज झालाय. 'झुंड' द्वारे नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणुन हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. याशिवाय काही मराठी कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये काही कलाकारांची झलक पाहायला मिळतेय. यात सैराट चित्रपटातील आर्ची आणि परश्या म्हणजचे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरही पाहायला मिळत आहेत.

या दोघांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असून ट्रेलरमध्ये त्यांची झलक पाहुन चाहत्यांना आनंद झालाय. आकाश ठोसर अनेक सीन्समध्ये पाहायला मिळतोय तर रिंकूची एक झलक ट्रेलरमध्ये दिसतेय. तेव्हा त्यांच्या काय भूमिका असतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याशिवाय अभिनेत किशोर कदम, छाया कदम हे कलाकारही या चित्रपटात झळकणार असून ट्रेलरमध्ये त्यांची झलक पाहायला मिळतेय.

 या सिनेमाच्या  प्रदर्शनाची चाहत्यांना बरीच उत्सुकता होती. याच्या रिलीजच्या अनेक घोषणा झाल्या होत्या. पण अखेर या सिनेमाच्या प्रदर्शनाला मुहूर्त मिळाला आहे. येत्या 4 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 
 नागपूरचे निवृत्त क्रीडाप्रशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. बिग बींची या सिनेमात मुख्य भूमिका असून नागराज मंजळे यांचं दिग्दर्शन आहे. या चित्रपटाला अजय-अतुल यांचं संगीत लाभलं असून चित्रपटाची काही गाणी प्रदर्शनाआधीच चर्चेत आली आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive