अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती मेहुल पैला कर्करोग झाल्याचं नुकतच समोर आलय. मेहुल हा कर्करोगाशी झुंज देत असल्याची बातमी समोर आलीय. मेहुलने सोशल मिडीयावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. मेहुलने अभिज्ञासोबतचा फोटो शेयर केलाय. यात मेहुलवर उपचार सुरु असल्याचं पाहायला मिळतय.
या पोस्टमध्ये मेहुलने लिहीलय की, "मला माझ्या आयुष्यात अनेक मूर्ख लोक भेटले आहेत. पण हा त्यापैकी सर्वात मोठा आहे… माफ करा …C…तू चुकीच्या व्यक्तीला निवडलं आहेस.” यामध्ये C म्हणजे मेहुलने कॅन्सरचा उल्लेख केल्याचं कळतय.
मेहुलची पोस्ट पाहुन अनेकांनी या पोस्टवर कमेंट करुन त्याला धीर दिलाय. मागील वर्षी अभिज्ञा भावे आणि मेहुल यांनी लगीनगाठ बांधली होती. सोशल मिडीयावरही ही गोड जोडी चर्चेत आली होती. अभिज्ञाने आत्तापर्यंत ‘रंग माझा वेगळा’, ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’ या प्रसिद्ध मालिकांमधून काम केलय. तर मेहुल हा व्यावसायिक आहे.