By  
on  

'सैराट'मध्ये आर्ची आता 'झुंड'मध्ये मोनिका , रिंकूचा हा हटके लुक पाहिलात का ?

नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीची एक वेगळी ओळख निर्माण करत अनेक विक्रम केले. आजही या चित्रपटाची आठवण झाली की त्यातील आर्ची सगळ्यांना आठवते. अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सैराट हा पहिला चित्रपट. सैराटनंतर तिला आर्ची अशीच ओळख मिळत गेली मात्र रिंकू सध्या सातत्याने वैविध्यपूर्ण कामही करताना दिसतेय. त्यातच आता पुन्हा एकदा ती नागराज मंजुळेंच्या चित्रपटात झळकणार आहे. नागराज मंजुळे यांच्या झुंड या चित्रपटात रिंकू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. झुंड हा नागराज मंजुळे यांचा पहिला हिंदी चित्रपट असून बिग बी महानायक अमिताभ बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

झुंड या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये रिंकूची झलकही पाहायला मिळतेय. या चित्रपटात रिंकू मोनिका हे पात्र साकारतेय. फक्त रिंकूच नाही तर सैराटमध्ये परश्याची भूमिका साकारणारा आकाश ठोसरही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल.

रिंकूने सोशल मिडीयावर या चित्रपटातील तिचा लुक समोर आणलाय. गडद काळसर मेकअप चढवलेला हा रिंकूचा लुक आहे. यात रिंकू वेगळी दिसतेय शिवाय तिचा पेहरावही वेगळा आहे. रिंकूचा हा लूक लक्ष वेधून घेतोय. रिंकूने सोशल मिडीयावर शेयर केलेल्या या लुकची चर्चा होऊ लागलीय. शिवाय नेटकऱ्यांनाही हा लुक आवडलेला दिसतोय.

तेव्हा झुंड मधील मोनिकाच्या भूमिकेतून रिंकू काय कमाल करतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Recommended

PeepingMoon Exclusive