मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार हे त्यांच्या चित्रपट आणि इतर कार्यक्रमांव्यतिरिक्त विविध राजकीय कार्यक्रमातही दिसतात. अशा कार्यक्रमांमध्ये जाण्याचा त्यांचा वेगळा अनुभव असतो. असाच एक अनुभव घेतलाय अभिनेत्री प्राजक्ता माळीने. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला प्राजक्ता माळीने हजेरी लावली होती. या निमित्ताने प्राजक्ताने पहिल्यांदाच राजकीय सभा अनुभवल्याचं ती तिच्या सोशल मिडीयावरील पोस्टमध्ये सांगतेय.
प्राजक्ता माळीचे सोशल मिडीयावर एक मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तेव्हा तिने एखादी पोस्ट शेयर केली की त्याला तिच्या चाहत्यांकडून तुफान प्रतिक्रिया मिळतात शिवाय तिची पोस्ट व्हायरल होते किंवा चर्चेत येते. असच या पोस्टच्या बाबतीत झालय. प्राजक्ताने ही सभा अनुभवल्यानंतर त्याविषयी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सभेचा व्हिडीओ शेयर केलाय. मात्र या पोस्टमध्ये प्राजक्ताने जे लिहीलय ते लक्षवेधी ठरतय.
प्राजक्ता लिहीते की, "नाही नाही..,कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही. काल आयूष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली (खूप दिवसांपासून अनुभवायचीच होती..) ते फक्त तुमच्याबरोबर share करतेय…,इतकाच हेतू, कलाकार नंतर आधी मी माणूस- सामाजिक प्राणी आहे; त्याच्या समृद्धी करता पण झटायला हवं. जसं फिल्मफेअर जाणं गरजेचं तसच हेही.., म्हणून हा घाट. ( तसही आता माझ्या आधार कार्ड वर मुंबईचा पत्ता आहे.)"
तिच्या या पोस्टमधील विधान हे चर्चेत आलय. कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करत नसल्याचं सांगत प्राजक्ताने ही पोस्ट केली आहे. त्यामुळे आगामी काळात प्राजक्ता राजकारणात प्रवेश करणार का ? या आणि इतर चर्चांनाही आता उधाण आलय. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही सभाही चर्चेत आल्याने प्राजक्ताच्या पोस्टवर अनेक कमेंट्सचा वर्षाव होतोय.