By  
on  

'शेर शिवराज' चित्रपटात हा प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता साकारणार अफजलखान ?

'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि  'पावनखिंड' या चित्रपटानंतर लेखक - दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे 'शेर शिवराज' हा चित्रपट घेऊन येत आहेत. शिवराज अष्टक भागांमधील त्यांचा हा चौथा चित्रपट असेल. या चित्रपटातून स्वारी अफझलखान म्हणजेच छत्रपती शिवाज महाराजांनी अफझलखानाचा केलाला खात्मा आणि त्याचा इतिहास पाहायला मिळणार आहे.

 

शिवराज अष्टकमधील मागील चित्रपटांप्रमाणेच याही चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. मात्र या चित्रपटात अफझलखानाच्या भूमिकेत कोण झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात असतानाच पुन्हा एकदा एका बॉलिवुड अभिनेत्याचं नाव समोर आलय. या चित्रपटात अफझलखानाच्या भूमिकेत प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता झळकणार असल्याचं बोललं जातय. 

 

प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता मुकेश ऋषी या चित्रपटात अफझलखानाच्या भूमिकेत झळकणार असल्याचं बोललं जातय. अफझलखानाच्या भूमिकेसाठी लागणारी देहबोली, शरीरयष्टी ही मुकेश यांच्याकडे असून ते एक उत्तम अभिनेते आहेत. मात्र चित्रपटाच्या टीमकडून याविषयी कोणतीच घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. 

येत्या 22 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'पावनखिंड' चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive