By  
on  

सई ताम्हणकरने दिली प्रेमाची कबुली ? हा आहे सईचा दौलतराव...

अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि बोल्ड अंदाजासाठी कायम चर्चेत असते. मराठीसह हिंदीतही तिने तिच्या अभिनयानं एक वेगळी ओळख निर्माण केलीय. मात्र एका वेगळ्या गोष्टीसाठी सई आता चर्चेl आलीय. 
सईचं नाव आता एका निर्मात्यासोबत जोडलं जातय. हा निर्माता म्हणजे अनीश जोग. ही चर्चा सुरु झालीय सईच्या सोशल मिडीयावरील पोस्टमुळे. सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक फोटो शेयर केलाय. हा फोटो आहे अनीश जोगचा. फक्त फोटोच नाही तर सईने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये जे लिहीलय ते पाहुन दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलय. 
सई या पोस्टमध्ये लिहीते की, “गॉश...बघ माझ्यामुळे तू कसा लाजतोयस” 

यासोबतच या पोस्टमध्ये साहेब दौलतराव सापडला असे हॅशटॅगही वापरण्यात आलेत.या पोस्टच्या कमेंट्समध्ये सईच्या चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही शुभेच्छा दिल्यात. 
एवढच नाही तर काही दिवसांपूर्वी अनीश जोगने सईसोबतचा फोटो पोस्ट करत तू आणि मी असं लिहीत खास पोस्ट केली होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anish Joag (@anishjoag)

तेव्हा सईने नुकत्याच केलेल्या पोस्टमधून प्रेमाची कबुली दिल्याचं पाहायला मिळतय. अनीशने आत्तापर्यंत अनेक मराठी चित्रपटाची निर्मिती केलीय. शिवााय सईच्या गर्लफ्रेंड, वायझेड, धुरळा या चित्रपटांची निर्मिती केलीय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive