By  
on  

पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार घोषीत, तर या कलाकारांना 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या वर्षी 6 फेब्रुवारी रोजी भारतरत्न लता दीदींच्या निधनाने आमच्या कुटुंबावर सर्वात मोठा दुःखद प्रसंग कोसळला. कुटुंब आणि ट्रस्ट (कुटुंबातील सर्व सदस्य प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत). प्रतिष्ठानने  भारतरत्न लता दीदींच्या स्मरणार्थ आणि स्मृतीप्रित्यर्थ यावर्षीपासून पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. हा पुरस्कार "लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार" म्हणून ओळखला जाईल, आणि दरवर्षी दीनानाथजींच्या स्मृतीदिनी म्हणजे 24 एप्रिल रोजी प्रदान केला जाणार आहे.


नुकत्याच पार पडलेल्या परत्रकार परिषदेत दिनानाथ मंगेशकर म्हटले की,  "यंदा मास्टर दीनानाथजींचा 80 वा स्मृती दिन आहे. त्यानिमित्त आम्ही "लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार" ची घोषणा करीत आहोत. हा पुरस्कार दरवर्षी देशासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान देणाऱ्या फक्त एकाच व्यक्तीला दिला जाईल. हा पहिला पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. ते आमचे सर्वात आदरणीय नेते आहेत; भारताला जागतिक नेतृत्वाच्या वाटेवर नेणारे ते एक आंतरराष्ट्रीय राजकारणी आहेत. त्यांच्या नेतृत्वात देशाने प्रत्येक बाबतीत नेत्रदीपक प्रगती केली आहे, हजारो वर्षांच्या गौरवशाली इतिहासात आपल्या महान राष्ट्राने पाहिलेल्या महान नेत्यांपैकी ते खरोखरच एक आहेत आणि हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल आमचे कुटुंब आणि ट्रस्ट त्यांचे आभार मानते"

उषा मंगेशकर या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तर गायक राहुल देशपांडे, ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता जॅकी श्रॉफ यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तर आनंदमयी पुरस्कार भागात नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट यांना समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवे अंतर्गत मास्टर दीनानाथ पुरस्कार देण्यात येईल. तर संज्या छाया यांना सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार घोषीत झालाय.

या कार्यक्रमात आपल्या लाडक्या माननीय लता दीदींच्या अमर सुरांना आणि आठवणींना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. रूप कुमार राठोड,  हरिहरन, आर्या आंबेकर, रीवा राठोड, प्रियांका बर्वे, मधुरा दातार आणि विभावरी आपटे या आपल्या मधुर संगीतांनी लतादीदींची गाणी सादर करणार आहेत.  

दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान, पुणे, हा एक नोंदणीकृत सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट असून मंगेशकर कुटुंबीयांनी 32 वर्षांपूर्वी स्थापन केला आहे. या प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा रविवार 24 एप्रिल 2022 रोजी मुंबईतील श्री षण्मुखानंद हॉल, येथे आयोजित करण्यात आला आहे. दीनानाथ मंगेशकर यांचा 24 एप्रिल हा स्मृतीदिन असून त्यानिमित्ताने या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive