पाहा Video : अमृता खानविलकरच्या 'चंद्रा' गाण्यावर सोनाली कुलकर्णीचा जबरदस्त डान्स

By  
on  

सध्या 'चंद्रमुखी' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील चंद्रा हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मिडीयावर तुफान गाजतय. या गाण्यातील अमृता खानविलकरचा डान्स आणि अदा लोकप्रिय ठरतायत. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही 'चंद्रा'वर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.

यातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीलाहा चंद्राची भुरळ पडलीय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील नुकताच सोशल मिडियावर चंद्रा गाण्यावरील तिचा जबरदस्त डान्स व्हिडीओ शेयर करत चित्रपटाच्या टीमल शुभेच्छा दिल्या आहेत.

 

'लावणीच्या प्रेमाखातर' असं कॅप्शन लिहून तिने या गाण्यावर ठेका धरलाय. या गाण्यावरील सोनालीचा डान्स आणि अदा लक्ष वेधून घेत आहेत. या पोस्टमध्ये सोनाली कुलकर्णी लिहीते की, ''लावणीच्या प्रेमाखातर आणि त्याचबरोबर 'हिरकणी' टीम विशेषतः प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे यांच्या प्रेमाखातर हा 'चंद्रा'वर नाचण्याचा मी प्रयत्न केला आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि चंद्रमुखीच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा.'' 

Recommended

Loading...
Share