By  
on  

सई ताम्हणकर 'मिमी'मध्ये क्रिती सनॉनसोबत, पाहा Photo

सरोगेट आई आणि मुलावर आधारित भारतातला पहिला सिनेमा अशी ओळख असलेला मला 'मला आई व्हायचंय'ने अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. समृध्दी पोरे लिखित दिग्दर्शित या सिनेमा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मिमी' असं या बॉलिवुड सिनेमाचं नाव आहे. 

'मिमी'  या बॉलिवुड सिनेमात उर्मिला कानेटकरने साकारलेली प्रमुख भूमिका क्रिती सनॉन साकारते आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यात आपली मराठीतील सुपरस्टार अभिनेत्री सई ताम्हणकरसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ती या सिनेमात क्रिती सोबत स्क्रीन शेअर करते आहे. याची माहिती खुद्द सईनेच आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन शेअर केली आहे. दोघींचासुध्दा एक धम्माल फोटो सईने पोस्ट करुन चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Peek-A-Boooooo !!! #shootlife #saitamhankar #kritisanon #mimi

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

 

या सिनेमाची कथा, दिग्दर्शन, निर्मिती, संवांद आणि गीतलेखन अशी सर्वच धुरा अॅड. समृध्दी पोरे यांनी सांभाळली. अभिनेत्री उर्मिला कोठारे ही या सिनेमात प्रमुख भूमिकेत होती.आता 'मला आई व्हायचंय' या सुपरहिट मराठी सिनेमावर आधारित 'मिमी' हा बॉलिवुड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचं फर्स्ट पोस्टर नुकतंच उलगडलं.

 

अभिनेत्री क्रिती सेनन 'मिमी' ह्या सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकतेय तर पंकज त्रिपाठीसुध्दा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. 'टपाल'फेम मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतायत. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive