या अभिनेत्याला चाहतीकडून होत आहे त्रास, सतत करत असते मेसेज

By  
on  

 आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी, त्यांना प्रभावित करण्यासाठी चाहते विविध गोष्टी करताना दिसतात. याच चाहत्यांकडून कलाकारांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळत असते. मात्र कधी कधी चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रिटीशी बोलण्यासाठी किंवा त्यांना भेटण्यासाठी मर्यादा ओलांडतात. असच काहीस झालय नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून काम करणाऱा अभिनेता संग्राम समेळच्या बाबतीत. आणि हे असं काही झालं की त्याला चक्क सोशल मिडीयाच्या माध्यमातून विनंती करावी लागली.

झालय असं की संग्रामला त्याची एक चाहती सतत मेसेज करते, एवढच नाही तर दिवसाला विविध नंबरवरून ती त्याला दररोज मेसेज करते. आणि याच गोष्टीचा संग्रामला मनस्ताप झाला आहे. या चाहतीच्या अशा वागण्यानं संग्रामला हा त्रास सहन करावा लागत आहे.    

आणि म्हणूनच संग्रामनं त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे पोस्ट केला आहे. या तरुणीचं नाव स्वीटी सातारकर असं असून दिवसभरात तिच्याकडून येणाऱ्या तीनशे ते चारशे मेसेजसमुळे संग्राम हैराण झाला आहे. आणि त्यामुळे संग्रामच्या खासगी आणि वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तिचे कुणी पालक किंवा परिचयात असल्यास त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचावा, असं संग्रामनं व्हिडिओत म्हटलं आहे.


 

Recommended

Loading...
Share