चंकी पांडेच्या मराठी डेब्यूसाठी अनन्या उत्सुक

By  
on  

‘तेजाब’ सिनेमातील अरब शेख आठवतोय का तुम्हाला. हा अरब शेख म्हणजे चंकी पांडे. ‘तेजाब’मध्ये चंकी पांडे आणि जॉनी लिव्हर यांची धमाल कॉमेडी पाहायला मिळाली होती. आणि आता चंकी पांडेची हिच अरब शेख भूमिका पुन्हा एकदा पाहायला मिळेल ती त्यांच्या आगामी सिनेमात.

विकून टाक असं सिनेमाचं नाव असून. चंकी पांडे यांचा हा मराठी डेब्यू आहे. हिंदीत बऱ्याच विनोदी भूमिका साकारल्यानंतर चंकी पांडे आता मराठी सिनेमांमध्ये खळखळून हसवायला सज्ज झालेत. या सिनेमातही त्यांचा अरब शेख भूमिकेतील अंदाज पाहायला मिळेल. 

नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी चंकी पांडे यांची हजेरी पाहायला मिळाली. चंकी पांडे यांना मराठी बोलता येत असून त्यांनी अधूनमधून मराठी आणि मग हिंदीत बोलत या सोहळ्याची शोभा वाढवली. मात्र हा सिनेमा का केला किंवा या सिनेमासाठी होकार का दिला या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं. मुलगी अनन्या याचं कारण असल्याचही सांगीतलं. चंकी पांडे म्हटले की, “ अरब शेखची भूमिका दुसऱ्यांदा करतोय. मुख्य म्हणजे मोठी मुलगी अनन्या या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे, तिला बघायचय की या सिनेमात मी मराठी कसा बोलतोय. तिच्यासाठी मी दोन तिन ऑडिशन दिले मग तिला पटलं की मी करु शकतो. परिवार मंडळीही या सिनेमासाठी उत्सुक आहेत आणि आता सिनेमा पाहण्याची वाट बघतोय.”


‘विकून टाक’ हा मराठी सिनेमा येत्या 31 जानेवारीला रिलीज होणार असून शिवराज वायचळ, राधा सागर, रोहित माने, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले,हृषिकेश जोशी, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर ही या सिनेमची स्टारकास्ट आहे.  

 

Recommended

Loading...
Share