By  
on  

खांद्याच्या दुखापतीनंतर चिन्मय म्हणतोय ‘चले चलो’ 

सिने कलाकारांचं व्यस्त आयुष्य असतं त्यात शरीराला फीट ठेवण्यासाठी तेवढा वेळ काढणं कधी कधी कठीण होतं. आणि मग अवयवांच्या दुखापतीला सामोरं जावं लागतं. असचं झालयं एका अभिनेत्याच्या बाबतीत. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरला मागील वर्षी एका सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. त्याला हालचाल करणेही कठीण जात होतं. फिटनेस लेव्हलही कमी होत होतं. याविषयीची माहिती स्वत: चिन्मयने सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

With chinmay and neha at gym @chinmay_d_mandlekar @nehamadanjoshi #marathicelebritycoach

A post shared by Sanjit Chandorkar (@sanjit.chandorkar) on

9 वर्षांपासून ज्या फिटनेस कोचवर चिन्मयचा विश्वास होता त्या संजीत चांदोरकरकडे चिन्मय गेला. आणि आता चिन्मयने स्वत:च्या शरीरावर फिटनेससाठी आणि खांद्याच्या दुखापतीवर मात करण्यासाठी व्यायाम सुरु केला आहे. याविषयी चिन्मय त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो की, “ मी यासाठी माझी पत्नि नेहा जोशीचेही धन्यवाद मानतो ती माझी प्रेरणा स्त्रोत आहे. मी अजूनही 100 टक्के फिट झालो नाही. सध्या ‘चले चलो’ हेच बोधवाक्य आहे.”

चिन्मयने त्याच्या जीममधील वर्कआउट करतानाचे व्हिडीओही सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Hats off this guy After such a crucial shoulder injury while shooting for FATTESHIKAST day 1 he was not able to lift his left hand not also 10% Due to which his fitness levels were collapsed But he is champion as always he took d decision to change things And today it's day 29th and he is dealing with heavy iron and creating intensity It's truly said No one can stop you accept you If he can do it we all can do it better then today So let's get more focused For any fitness, nutrition & transformation plans Reply "yes" I will connect u asap @chinmay_d_mandlekar #nutri5fitclub #workingoutmotivation #workoutroutine #inspiration #getfitwithme #sanjitanu24 #marathiactorssfitness #marathicelebritycoach

A post shared by Sanjit Chandorkar (@sanjit.chandorkar) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive