मराठी मनोरंजन विश्वात पॉप गाणी कमीच बनतात. मात्र यात मराठी पॉप म्युझिकमध्ये विविध प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे पॉप सिंगर, रॅपर, दिग्दर्शक, निर्माता असा मल्टी टॅलेंटेड श्रेयस जाधवचा. रॅपर म्हणून त्याचं ‘किंग जेडी’ असं नाव आहे. त्याच्या हटके स्टाईलसाठीही श्रेयस ओळखला जातो. काही सिनेमांची निर्मिती मग दिग्दर्शन करत असताना श्रेयस अधूनमधून त्यांच पॉप गाण्यांविषयी असलेली आवड पुर्ण करतो. त्यासाठी त्याची विविध रॅप गाणीही आत्तापर्यंत त्याने आणली आहे. मात्र नुकतच श्रेयसचं आणखी एक नवं गाणं रिलीज झालं आहे. ‘मुंबईची छोरी’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं चक्क युरोपमधील आर्मेनिया येथे चित्रीत करण्यात आलं आहे. गाण्याचा लुक हा अगदी हिंदी-पंजाबी अल्बम सारखा असल्यानं गाण्याची चांगलीच चर्चा होत आहे. हे गाणं हिंदी, पंजाबी पॉप गाण्यांच्याही तोडीस तोड असल्याचं पाहायला मिळतयं.
याच गाण्याच्या निमित्ताने श्रेयसने पिपींगमून मराठीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. यावेळी श्रेयस म्हटला की, “पंजाबी इंडस्ट्रीमधील गाणी आता ग्लोबल मार्केटमध्ये ओळखली जातात. त्याला त्यांनी तो दर्जा दिला आहे. मराठीच्या बाबतीतही असचं व्हावं अशी माझी इच्छा आहे. मी या गोष्टीचा आता पुढाकार घेत आहे. आणि माझं नवीन गाणं भारताबाहरे युरोपमधील अर्मेनियामध्ये शूट केलं आहे. मराठी पॉप म्युझिक बदलण्यासाठी कुणीच प्रयत्न करत नाही किंवा पुढाकार घेत नाही. मला मराठी पॉप म्युझिकमध्ये बदल घडवून आणायचाय.”
या गाण्यानंतर आता किंग जेडीची गाणी दर महिन्याला रिलीज होणार आहेत. दर महिन्याला एक गाणं श्रेयस रिलीज करणार असल्याचं त्याने सांगीतलयं. याविषयी श्रेयस म्हटला की, “नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न राहीला आहे. मराठी इंडस्ट्रीचा विचार करूनच मी या सगळ्या गोष्टी करतो. असं काही करायचं आहे जे सुपरहीट झालं पाहिजे. आत्तापर्यंत 50 -60 गाणी लिहूनही तयार आहेत.”
आगामी काळात श्रेयस पुन्हा मराठी सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन करताना दिसेल. सध्या ‘देसी बॉईज’ असं नाव ठरलेल्या सिनेमावरही तो काम करणार आहे.